जिल्हा सामान्य रुग्णालयात व्यसनमुक्ती दिन साजरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, June 25, 2026

जिल्हा सामान्य रुग्णालयात व्यसनमुक्ती दिन साजरा



अमरावती, दि. २६  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :
जिल्हा सामान्य रूग्णालयात दि. २२ जूनला  जागतिक व्यसनमुक्ती दिन साजरा करण्यात आला. प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नरेंद्र सोळंके अध्यक्षस्थानी होते.

यावेळी मानसोपचार तज्‍ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने, डॉ. प्रेषीत मढवी, डॉ. ऋषिकेश घोरपडे, अधिसेविका ललिता अटाळकर, भावना पुरोहित, श्रद्धा हरकंचे, प्रमोद भक्ते, सुनील कळतकर, सारा बांगड, सचिन टवलारे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. सोळंके, डॉ. गुल्हाने, डॉ. मढवी, श्रीमती पुरोहीत यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीबाबत उपचार आणि निदान याबात मार्गदशन केले. सारा बांगड यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद भक्ते यांनी आभार मानले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages