आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल ऋषिकेश शर्मा यांच्याकडून अभिनंदन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, June 25, 2026

आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल ऋषिकेश शर्मा यांच्याकडून अभिनंदन

 

दि.२६ 
अमरावती- अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी मिळविलेल्या दणदणीत व ऐतिहासिक विजयाबद्दल भाजपा राजस्थान प्रकोष्ठ सेल, अमरावती शहराचे अध्यक्ष ऋषिकेश अनिल शर्मा यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

ऋषिकेश शर्मा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवून नवा इतिहास रचला आहे. तसेच सलग दुसऱ्यांदा क्लीन स्वीप करत 421 वैध मतांपैकी तब्बल 390 मते मिळवून त्यांनी मतदारांचा प्रचंड विश्वास संपादन केला आहे.

ते पुढे म्हणाले की, आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी महाराष्ट्र शासनात राज्यमंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्य करताना जिल्ह्याच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामांना गती मिळाली असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे.

ही विजयश्री पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख व जनकल्याणकारी धोरणांवर जनतेने व्यक्त केलेला विश्वास असल्याचेही ऋषिकेश शर्मा यांनी नमूद केले. आगामी काळातही आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्याच्या विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages