स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, June 25, 2026

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ



अमरावती, दि. २६  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील सभागृहात शुक्रवार, दि. 19 जून रोजी सामजिक न्याय विभागाच्या वाचनालयाकरीता पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली.

यावेळी प्रादेशिक उपायुक्त माया केदार, सहायक आयुक्त समाज कल्याण राजेंद्र जाधवर, सहायक आयुक्त समाज कल्याण मंगला मून, श्री. वाठ, मनोज मेरत, विशेष अधिकारी श्री. मोरे, समाज कल्याण निरिक्षक आर. जे. महालकर उपस्थित होते. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना नशामुक्त भारत अभियान, विकसित भारत की पहचान बाबत सामुदायिक शपथ देण्यात आली. तसेच nmba.dosje.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन शपथ घेणे, तसेच अभियानामध्ये सहभागी होण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सामाजिक न्याय आणि अधिकारीता विभागामार्फत आज दि. 26 जून रोजी आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिवस साजरा केला जातो. त्यानुसार सर्व महाविद्यालय, शासकीय अनुदानित वसतिगृह, व्यसनमुक्ती केंद्रात नागरिकांच्या सहभागासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. नागरिकांनी दि. 7 ते 26 जून दरम्यान सामाजिक सप्‍ताहात आयोजित नशामुक्त भारत अभियान विकसित भारत को पहचान या संकल्पनेवर आधारीत कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी विलास मसराळे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages