ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनी मानधन सन्मान योजनेसाठी अर्ज करावेत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, June 25, 2026

ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनी मानधन सन्मान योजनेसाठी अर्ज करावेत




*1 ते 31 जुलै दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. २६  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांसाठी राजर्षि शाहु महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन सन्मान योजना आहे. यासाठी कलाकारांनी 1 ते 31 जुलै दरम्यान अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेसाठी सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यानुसार या योजनेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, तर सदस्य सचिव उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग राहणार आहेत. तसेच कलावंताची मानधन योजनेसाठी निवड करताना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जाणार आहे. त्यामुळे पात्र कलावंतांनी aaplesarkar.mahaonline.gov.in या लिंकवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालासाहेब बायस यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages