ब्राह्मणवाडा थडी येथील वीजपुरवठा सतत खंडित बाबत निवेदन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, June 25, 2026

ब्राह्मणवाडा थडी येथील वीजपुरवठा सतत खंडित बाबत निवेदन

 

अखिल भारतीय पत्रकार संघटनेचा पुढाकार 

दि. २६  ब्राह्मणवाडा थडी,  राजेश खडसे :-

चांदूरबाजार तालुक्यातील चांदूरबाजार, ब्राह्मणवाडा थडी, वणी, घाटलाडकी या गावातील विज पुरवठा नेहमीच खंडित होत असल्याकारणाने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे चांदूरबाजार ते ब्राह्मणवाडा थडी या मार्गावरील मुख्य लाईन मध्ये सतत होत असलेल्या स्पार्किंग मुळे आणि घाटलाडकी - कुरणखेड ते ब्राह्मणवाडा थडी या मार्गावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर स्पार्किंग होऊन वीजपुरवठा नेहमीच खंडित होत असतो यावर उपाययोजना करण्याकरिता ब्राह्मणवाडा थडी येथील कनिष्ठ अभियंता मयूर देशमुख यांना निवेदन देऊन संबंधित समस्येवर तात्काळ निर्णय घेऊन उपाययोजना करावी करिता निवेदन दिलेले आहे देशमुख साहेब यांनी तात्काळ निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून कामाला सुरुवात केलेली आहे पत्रकार संघटनेच्या निवेदनाने तात्काळ समस्येचे निराकरण करण्यात आले असून आठ ते दहा दिवसात संपूर्ण काम पूर्ण होऊन लाईन व्यवस्थित कार्यरत राहील असेही त्यांनी आश्वासन दिले. अखिल भारतीय पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉ. राहुल अहिर, तालुका उपाध्यक्ष राजेश खडसे यांनी निवेदन सादर केले.

प्रतिक्रिया 

लाईनचे 90 टक्के काम पूर्ण झालेले असून दहा टक्के काम राहिलेले आहे येणाऱ्या आठ ते दहा दिवसांमध्ये उर्वरित काम पूर्ण होऊन समस्येची पूर्ण निराकरण करण्यात येईल.

मयूर देशमुख 

कनिष्ठ अभियंता ब्राह्मणवाडा थडी

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages