विधी सेवा प्राधिकरणाचा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, June 25, 2026

विधी सेवा प्राधिकरणाचा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम

 


अमरावती, दि. २६  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग कार्यक्रम घेण्यात आला. रविवार, दि. 21 जून रोजी सकाळी 6.30 वाजता हा कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उन्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि , प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघाने कार्यक्रमात सहभाग नोंदविला. यावेळी जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश वरीष्ठस्तर, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, अमरावती जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी आणि सदस्य, अपर जिल्हाधिकारी, जिल्हा शासकीय अभियोक्ता आदी उपस्थित होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी आभार मानले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages