शिरजगाव कसबा परिसराला मुसळधार पावसाचा तडाखा. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, June 30, 2026

शिरजगाव कसबा परिसराला मुसळधार पावसाचा तडाखा.


शिरजगाव कसबा दिनांक १
डींगाबर सुने 
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

  चांदूरबाजार तालुक्यात  २९ रात्री ८ वाजता चे सुमारास जवळपास २ तास मुसळधार  पाऊस शिरजगाव कसबा व परिसरात झाल्याने मेघा नदीला मोठा पूर आला आहे.
गावातील अनेक सकल भागात घरे व आठवडी बाजारात परिसरातील दुकानांमध्ये  पावसाचे पाणी  शिरल्याने दुकानदारांची तारांबळ व मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.अचानक झालेल्या मुसळधार पावसाने गावातील मुख्य रस्ते ला नदी नाल्यांचे स्वरूप पाहायला मिळाले आहे .ब्राह्मणवाडा थडी शिरजगाव मार्ग ते परतवाडा या महामार्गावरील वाहतूक थांबलेली होती, मुसळधार पावसामुळे नाल्यांना पूर असल्याने ४ ते ५ तास वाहतूक दोन्ही बाजूने  ठप्प होती त्यामुळे या मार्गावरील सर्वच वाहतूक चालकांना व प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे .शिरजगाव येथील आठवडी बाजार परिसरातील अंगणवाडी मध्ये सुद्धा पुराचे पाणी शिरले आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना रात्री ८ वाजता पासून गावातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याने ग्रामस्थांना गावात मध्यरात्री २वाजेपर्यंत अंधाराचे साम्राज्य होते त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप झाला आहे.
महावितरणच्या कार्यालयाच्या कार्यप्रणाली प्रश्नचिन्ह
पाऊस सुरू झाला की विद्युत महावितरणचे कर्मचारी बंद करून टाकत आहे. यामुळे महावितरण चे कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .विशेष म्हणजे गावातील आपत्ती जनक परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनातील गावात नियुक्त असलेला  अधिकारी कर्मचारी गावात उपस्थित नसल्याने नागरिकांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस वाऱ्यावर सोडल्याची ग्रामस्थांमध्ये संतप्त रोष प्रतिक्रिया पाहायला मिळाली आहे.

मध्यप्रदेश सातपुडा पर्वत भागात मुसळधार पाऊस
 मध्य प्रदेश  सीमेलगत असणाऱ्या शिरजगाव कसबा येथून वाहणाऱ्या मेघा नदीला मोठा पूर आल्याने परिसरातील नाले नद्या दुथडी भरून वाहत होते मेघा नदीला लागून असणाऱ्या गावालगत नाल्याला परिसरातील मुसळधार पावसामुळे सुद्धा मोठा पूर आल्याने नाल्याचे पुराचे पाणी थेट गावातील आठवडी बाजारातील अनेक दुकानांमध्ये शिरल्याने अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीने दुकानदारांची त्यामुळे तारांबळ उडाली असून त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सुद्धा  झाले आहे. आठवडी बाजाराच्या बाजूला मेघा नदीला संरक्षण भिंत बांधकाम करताना या नाल्याचे पाणी पुलाचे योग्य बांधकाम न केल्याने आठवडी   बाजारातील व्यापारांचे दरवर्षी नुकसान होत आहे. या जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
चांदूरबाजार तालुक्यातील पांढरी गावातील २ व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना
शिरजगाव कसबा चे बाजूला असलेल्या पांढरी गावातील २ नागरिक  नाल्यामध्ये वाहुन गेल्यांची घटना घडली आहे. त्यांची नावे गोपाल निर्वार व रवींद्र आवारे राहणार पांढरी चे आहे . शिरजगाव ते पांढरी या मार्गावरील चारगड नाल्याला काल झालेल्या मुसळधार पावसाने पूर आला होता हे दोघेही शिरजगाव कसबा येथून रात्री १०चे सुमारास त्यांच्या मूळ गावी पांढरी येथे पायदळ जात होते ,  पुराचा पाण्याचा अंदाज त्यांना आला नसावा या मार्गावरील नाल्याच्या पुलाला ओलांडताना पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले आहे. सध्या त्यांचा शोध घेण्याकरिता  अमरावती येथून डी डी आर एफ टीम यांना प्राचारण केले असून  सकाळपासूनच पांढरी ग्रामस्थ त्यांचा शोध घेत असताना घटनास्थळापासून २ किलोमीटर अंतरावर सुधाकर सावरकर यांच्या शेताजवळ नाल्याला रवींद्र रामभाऊ आवारे यांचा मृतदेह काटेरी झुडपांमध्ये अडकलेला मृत अवस्थेत आढळून आला आहे.तर या घटनेत  गोपाल निर्वार राहणार पांढरी हा सुद्धा वाहून गेल्याने या व्यक्तीचा शोध सध्या डी डी आर एफ टीम व स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेणे सुरू आहे रवींद्र आवारे यांचा मृतदेह उर्वरित तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पाठवण्यात आला आहे .
घटनास्थळ पंचनामा वेळी शिरजगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार प्रमोद राऊत व अचलपूर उपविभागीय अधिकारी बळवंत आखराव तसेच चांदूरबाजार तहसीलदार योगेश गाडेपाटील व मंडल अधिकारी परवेज पठाण व संबंधित तलाठी व कोतवाल महसूल व पोलीस कर्मचारी घटनास्थळी  उपस्थित होते.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages