शिरजगाव कसबा, चांदूरबाजार, मार्गे ब्राह्मणवाडा थडी केंद्रीय रस्तेनिधी मार्गावर कंत्राटदाराचे दुर्लक्ष - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, June 1, 2026

शिरजगाव कसबा, चांदूरबाजार, मार्गे ब्राह्मणवाडा थडी केंद्रीय रस्तेनिधी मार्गावर कंत्राटदाराचे दुर्लक्ष


शिरजगाव कसबा दिनांक २ जून  अब्दुल करीम
 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

 शिरजगाव कसबा, ब्राह्मणवाडा थडी चांदूरबाजार  मार्ग केंद्रीय निधीमधून बांधकाम सुरू आहे.रस्त्यावर शिरजगाव कसबा प्राथमिक आरोग्य केंद्र समोर पाचपावली ठिकाणी मुरूम, गिट्टी टाकून रस्ता मजबुतीकरण करण्यात न आल्यामुळे एसटी बस व टिप्पर गाडी माती मध्ये फसलेलीआहे. वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना त्रास होत  आहे.

 या मुख्य मार्गावरील वाढती गैरसोय पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. कंत्राटदाराला तत्परतेने काम करण्याचे आदेश देऊन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.


 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages