ब्रेकिंग न्यूज: चंद्रपुर जिल्ह्याच्या शिंदेवाही येथे ४ महिलांचा बळी घेणारी वाघीण परतवाड्यात येथील टी टी आर सेंटर ला - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, June 2, 2026

ब्रेकिंग न्यूज: चंद्रपुर जिल्ह्याच्या शिंदेवाही येथे ४ महिलांचा बळी घेणारी वाघीण परतवाड्यात येथील टी टी आर सेंटर ला



मेळघाट च्या जंगलात सोडण्याच्या हालचाली सुरू आहे. 
दि. २ चंद्रपूर :- 
चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही जंगलात तब्बल चार ग्रामीण महिलांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक टी-२ (T-2) वाघिणीला अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील वन्यजीव विभागाच्या टीटीआर (Transit Treatment Centre) सेंटरमध्ये आणण्यात आले आहे. ही वाघीण सध्या परतवाड्यात असून, तिला मेळघाटच्या घनदाट जंगलात मुक्त सोडण्याच्या हालचाली वन विभागाकडून सुरू असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या शक्यतेमुळे मेळघाट आणि अचलपूर परिसरातील स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे आणि तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
मे २०२६ मध्ये सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलांच्या गटावर या वाघिणीने अचानक हल्ला चढवला होता. यात चार महिलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. 
या भयंकर घटनेनंतर वन विभागाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रेस्क्यू टीमच्या (RRT) साहाय्याने विशेष शोध मोहीम राबवून २४ मे रोजी या वाघिणीला ट्रॅन्क्युलायझर डार्ट (गुंगीचे औषध) मारून जेरबंद केले होते. 
जेरबंद केल्यानंतर नागपूरच्या गोरेवाडा बचाव केंद्रात जागा उपलब्ध नसल्याच्या कारणास्तव या वाघिणीला परतवाडा येथील टीटीआर सेंटर  मध्ये आणून ठेवण्यात आले. मात्र, वाघिणीला आणल्यापासून स्थानिक प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळली आहे. 
या नरभक्षक वाघिणीला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत जंगलात सोडण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र, या संवेदनशील विषयावर स्थानिक वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि वन्यजीव विभागाचे अधिकारी उघडपणे काहीही बोलण्यास किंवा अधिकृत माहिती देण्यास पूर्णपणे टाळाटाळ करत आहेत. 
नागरिकांचा वाढता विरोध आणि भीती
चंद्रपूरमध्ये धुमाकूळ घालून मानवी रक्ताची चटक लागलेली ही नरभक्षक वाघीण जर मेळघाटात सोडली, तर मेळघाटातील आदिवासी बांधव, शेतकरी आणि जंगलावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत स्थानिक सर्व वन विभाग अधिकारी या विषयावर बोलणे टाळत आहे.आधीच मेळघाटात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र असताना, अशा धोकादायक वाघिणीला येथे आणून सोडण्याच्या वन विभागाच्या कथित निर्णयाला स्थानिक स्तरावरून तीव्र विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages