पसंतीच्या दुचाकी क्रमांकासाठी सोमवारी अर्ज करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, May 21, 2026

पसंतीच्या दुचाकी क्रमांकासाठी सोमवारी अर्ज करण्याचे आवाहन


अमरावती, दि. २२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे परिवहनेत्तर (दुचाकी) संवर्गातील वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे. या मालिकेतील आवडते किंवा पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी इच्छुक वाहनधारकांनी सोमवार, दि. 25 मे रोजी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात 25 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंतच खिडकी क्रमांक 25 अर्ज स्वीकारले जातील. यासाठी वाहन ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, त्या व्यक्तीच्या नावाचा अर्ज, पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड आणि आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक अर्जावर नमूद करणे अनिवार्य आहे. पसंती क्रमांकाचे विहित शुल्क अमरावती कॅम्प ब्रँच, ट्रेझरी ब्रँच कोड नं. 003866 करिता देय असलेल्या डिमांड ड्राफ्टद्वारे भरणे आवश्यक आहे.

ज्या पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज असेल किंवा एकापेक्षा जास्त अर्ज आले असतील, अशा क्रमांकाची यादी 25 मे रोजीच सायंकाळी 4 वाजता कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावली जाईल. एकाच क्रमांकासाठी दोन किंवा अधिक अर्ज आले असल्यास 26 मे रोजी दुपारी 1.30 वाजेपर्यंत मूळ शुल्काव्यतिरिक्त जादा रकमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात खिडकी क्र. 25 वर जमा करावा लागणार आहे. दुपारी 3 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात लिफाफे उघडले जातील. सर्वाधिक रकमेचा डिमांड ड्राफ्ट असलेल्याला पसंती क्रमांक दिला जाईल. उर्वरित अर्जदारांचे डीडी परत केले जातील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी कळविले आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages