दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ कार्यक्रम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, May 21, 2026

दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ कार्यक्रम



अमरावती, दि. २२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी 21 मे रोजी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’साजरा केला जातो. यानिमित काल जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी गोविंदा दानेज यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची अधिकारी-कर्मचाऱ्यांना शपथ दिली. 

 दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages