चांदूरबाजारात पहिल्यांदाच हत्तीवरून निघाली नवरदेवाची मिरवणूक - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, May 19, 2026

चांदूरबाजारात पहिल्यांदाच हत्तीवरून निघाली नवरदेवाची मिरवणूक

 


जयस्तंभ चौकात वाहतूक ठप्प, बघ्यांची प्रचंड गर्दी!

दि. १९ चांदूरबाजार (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
स्थानिक जयस्तंभ चौक परिसरात अचानक वाहतूक पूर्णपणे जाम झाली आणि डीजेच्या बुलंद आवाजाने सारा चौक दुमदुमून गेला. निमित्त होते चांदूरबाजार शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच हत्तीवर स्वार होऊन निघालेल्या एका नवरदेवाच्या शाही मिरवणुकीचे. ही अनोखी मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
अमरावती तालुक्यातील सालोरा येथील रहिवासी आणि पेशाने वकील असलेले भुजंगराव खडसे यांचा विवाह चांदूरबाजार येथील स्थानिक लंगोटे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या लग्नाचे औचित्य साधत नवरदेव भुजंगराव हे चक्क हत्तीवर स्वार होऊन मंगल कार्यालयाकडे रवाना झाले. त्यांचा हा राजेशाही थाट संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला.
डीजेचा प्रचंड आवाज आणि वाहनांच्या अलोट गर्दीमुळे हत्ती चवताळू नये किंवा बिथडू नये, म्हणून विशेष काळजी घेण्यात आली होती. सुरक्षेचा उपाय म्हणून हत्तीच्या सभोवताल १० ते १५ व्यावसायिक सुरक्षा रक्षक (बाउन्सर) तैनात करण्यात आले होते. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक ही मिरवणूक पुढे नेली.
चांदूरबाजारात अशा प्रकारे हत्तीवरून मिरवणूक निघण्याची ही पहिलीच वेळ असल्याने बालगोपाळांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठीच हा क्षण अत्यंत कुतूहलाचा आणि आकर्षणाचा ठरला. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये हे दृश्य टिपून घेतले.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages