पांढरकवडा आदिवासीविकास प्रकल्पात ‘ट्रायबल फेलो’ पदांसाठी भरती - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, May 19, 2026

पांढरकवडा आदिवासीविकास प्रकल्पात ‘ट्रायबल फेलो’ पदांसाठी भरती



 इच्छुकांनी मुलाखतीसाठी 25 मे रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन

अमरावती, दि. २० : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत दोन ‘ट्रायबल फेलो’ पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही नियुक्ती 10 महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दि. 25 मे 2026 रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी आवश्यक कागदपत्रांसह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी रेवैयाह डोंगरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

‘ट्रायबल फेलो’ पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि किमान 60 टक्के गुण प्राप्त केलेले असावेत. उमेदवारांना संगणक व इंटरनेटचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांचे वय 21 ते 26 वर्षांच्या दरम्यान असावे.

याशिवाय, किमान एक वर्षाचा स्वयंसेवी संस्थेमध्ये कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. आदिवासी क्षेत्रात आदिवासी समुदायासोबत प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांनाही विशेष प्राधान्य राहील. उमेदवारांना मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह 25 मे 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाव्दारे कळविण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages