विद्यार्थ्यांनी बँक खात्यांची अचूक माहिती द्यावी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, May 26, 2026

विद्यार्थ्यांनी बँक खात्यांची अचूक माहिती द्यावी


शाहू महाराज पुरस्कारासाठी 31 मेपर्यंत संधी

अमरावती, दि. २७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड चुकीचे असल्याने त्यांच्या खात्यात अद्याप पुरस्काराची रक्कम जमा होऊ शकलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 31 मेपर्यंत अचूक माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलबद्दल 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार' प्रदान करण्यात येतो. विद्यार्थ्यांनी आपल्या मूळ अर्जात चुकीचे बँक खाते क्रमांक किंवा आयएफएससी कोड नमूद केल्यामुळे त्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास अडचण येत आहे.

याबाबत समाज कल्याण कार्यालयाकडून महाविद्यालयांना सूचना देण्यात आली आहे. परंतू महाविद्यालयांनी अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांचे अचूक बँक तपशील समाज कल्याण कार्यालयाकडे जमा केलेले नाहीत. त्यामुळे महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर पुरस्काराची रक्कम त्वरित जमा व्हावी, यासाठी संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अचूक बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड दुरुस्त करून 31 मे पर्यंत समाज कल्याण कार्यालयात संपर्क साधून ते जमा करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त राजेंद्र जाधव यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages