केळी बागांचे उष्णतेमुळे प्रचंड नुकसान; शासनाने आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, May 27, 2026

केळी बागांचे उष्णतेमुळे प्रचंड नुकसान; शासनाने आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी


दि. २७  अंजनगाव सुर्जी :-
केळी बागांचे उष्णतेमुळे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी डीगांबराव नामदेवराव भोंडे यांनी केली आहे.
उन्हाचा पारा ४५ ते ४६ डिग्री सेल्सिअस पर्यंत गेल्यामुळे केळीच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. कडक उन्हामुळे केळीच्या संपूर्ण बागा जळून गेल्या आहेत. केळीची पाने पूर्णपणे करपून पिवळी पडली आहेत. तसेच केळीच्या घडांची वाढ संपूर्णपणे खुंटली आहे. दिवस-रात्र शेतात अतोनात परिश्रम करून केळीचे पीक मोठे केले होते. मात्र, आता पिकाची अशी अवस्था झाली आहे की केळीसाठी लावलेला साधे भांडवल आणि खर्चसुद्धा निघणे कठीण झाले आहे.
 सरकारने तात्काळ नुकसानग्रस्त केळीच्या बागांचे अधिकृत पंचनामे करावेत. संकटकाळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी.
 डीगांबराव नामदेवराव भोंडे (केळी उत्पादक शेतकरी)

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages