उत्तमराव गुजर
पानपिंपरी उत्पादक शेतकरी.
अंजनगाव सुर्जी.
पानपिंपरी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
अंजनगाव सुर्जी दिनांक २७ अशोक पिंजरकर
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
प्रचंड तापमानाचा मोठा परिणाम पान पिंपरी (लेंडी पिंपरी) , केळी व संत्रा फळावर झाला असून त्याचा फटका उत्पादनावर होणार असल्याने पानपिंपरी, केळी , संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पानपिंपरी (लेंडी पिंपरी) हे औषधी गुणधर्माने युक्त असलेले नाजूक आणि जोखमीचे पीक आहे. या औषधीयुक्त असलेल्या पानपिंपरी चा उपयोग आयुर्वेदिक औषधीमध्ये केल्या जातो. पानपिंपरी या पिकाची शेतामध्ये जानेवारी फेब्रुवारी मध्ये लागवड करून या पिकाचे उत्पादन अंजनगाव सुर्जी मध्ये केवळ बारी समाज अतिशय परिश्रमाने घेत असतो. एप्रिल पासून सुरू असलेली उष्णता वाढत गेल्याने तापमानात अधिकच वाढ होऊन 40 डिग्री सेल्सिअस च्या वर तापमान गेल्याने पानपिंपरी या पिकाला धोका निर्माण झाला. ते अतिशय नाजूक आणि जोखमीचे असलेले पीक धोक्यात आले. कडक उन्हामुळे वेलीची पानगळ सुरू झाली. अति उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा कमी झाल्याने वाढणारी मन आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण भीती निर्माण झाली असून वाढती पानगळ तीव्र उन्हाच्या झळामुळे वेलीवर पाने पिवळी पडून गळण्याचे प्रमाण वाढले आहे. अतिशय उष्णतेमुळे नाजूक असलेल्या पान पिंपरी चे पाने पिवळी पडून कोमजल्यासारखे दिसून येत आहेत. वाढत्या तापमानामुळे पानपिंपरीचे पान करपून गळत आहे. त्यामुळे वेलाच्या वाढीवर सुद्धा त्याचा परिणाम झाला आहे. अति उष्णतेचा पान पिंपरी या नाजूक पिकावर येत असून त्याचा मोठा परिणाम उत्पादनावर होत असल्याचे पानपिंपरी उत्पादक शेतकरी सांगत आहे.
पानपिंपरी हे नाजूक आणि सतत ओलावा लागणारे पीक असल्याने जास्त तापमानात या झाडांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होत असते त्यामुळे पाने वाळणे , कडा जळणे, पानावर पिवळे डाग येणे आणि झाडाचा ताजेपणा कमी होणे असा मोठा परिणाम या प्रचंड उष्णतेमुळे पानपिंपरी उत्पादनावर झाला असून यामुळे पानपिंपरी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पानपिंपरी उत्पादनावर शेतकरी आणि शेतमजूर यांचे उपजीविका चालते. या प्रचंड उष्णतेमुळे त्यांच्यासमोर पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे बारी समाजातील ज्यांच्याजवळ शेती नाही असे शेतमजूर सुद्धा तीन ते चार जण मिळून शेती लागवन नी करतात तर कुठे वाफे पद्धतीने करार करून पानपिंपरी ची लागवड करतात. या अतिउष्णतेच्या परिणामामुळे पानपिंपरी उत्पादक शेतकरी, शेतमजूर अतिशय संकटात सापडले असून शासनाकडून. आर्थिक मदतीची मागणी करीत आहे.
अति उष्णतेचा पानपिंपरीवर मोठा परिणाम झाला आहे
अतिशय परिश्रमानं शेतात उभं केलेल्या पानपिंपरी पिकाला यावर्षीच्या प्रचंड उष्णतेचा फटका या नाजूक पिकाला बसला असून वेलीवरची पालक पिवळी पडत आहे. पानपिंपरीचे पान करपून गळून पडत आहे. प्रचंड उष्णतेमुळे पानपिंपरीचे पीक तग धरत नसून वेली उष्णतेने करपत आहे. याचा मोठा परिणाम उत्पादनावर झाला आहे. आमची उपजीविका त्यावर अवलंबून आहे. या प्रचंड उष्णतेमुळे पानपिंपरी उत्पादक ,केळी व संत्रा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अशावेळी शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.
उत्तमराव गुजर
पानपिंपरी उत्पादक शेतकरी अंजनगाव सुर्जी