'अंजनगाव विचारमंच'चा पुढाकार; विदर्भातील जनतेला वीज बिलात ५०% सूट देण्याची शासनाकडे मागणी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, May 27, 2026

'अंजनगाव विचारमंच'चा पुढाकार; विदर्भातील जनतेला वीज बिलात ५०% सूट देण्याची शासनाकडे मागणी

दि. २७ अंजनगाव सुर्जी :-

विदर्भातील अतिउष्णतामान ही नैसर्गिक आपत्ती घोषित करून जनतेला वीज युनिटमध्ये ५०% सूट द्यावी, अशी मागणी अंजनगाव सुर्जी येथील 'अंजनगाव विचारमंच' या प्रसिद्ध सोशल मीडिया ग्रुपवर करण्यात आली असून याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
  अंजनगाव सुर्जी तालुक्यातील प्रसिद्ध सोशल मीडिया ग्रुप 'अंजनगाव विचारमंच' चे ग्रुप सदस्य तथा माजी नगराध्यक्ष ॲड. कमलकांत लाडोळे यांनी ही मागणी जाहीरपणे विचारमंचवर  मांडली आहे.
 विदर्भात मार्च महिन्यापासून उष्णतेची लाट आणि अतिउष्णतामान सातत्याने वाढत गेले आहे. ही एक नैसर्गिक आपत्ती असून शासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
 विदर्भात विजेचे उत्पादन होते, परंतु त्याचा फायदा उर्वरित महाराष्ट्राला जास्त होतो. त्यामुळे विदर्भातील जनतेला या नैसर्गिक आपत्तीच्या काळात वीज युनिटमध्ये ५० टक्के सूट शासनाने दिली पाहिजे.
⚡ वीज बिलात सवलतीची गरज का? 
 प्रचंड उन्हाळ्यामुळे नागरिकांना सुटकेसाठी पंखे, कुलर आणि एसी (AC) यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागत आहे.
अतिवापरामुळे वीज युनिटची संख्या वेगाने वाढली आहे. वीज वितरण कंपनीच्या नियमांनुसार युनिट्स वाढल्यास विजेचे 'स्लॅब' बदलतात, ज्यामुळे नागरिकांना अत्यंत महागड्या दराने वीज बिल आकारले जात आहे.
 कडक उन्हामुळे विदर्भातील उद्योगधंदे, रोजगार, शेती आणि आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. लोकांची कार्यक्षमता घटल्याने त्यांचे आर्थिक उत्पन्न कमी झाले आहे. अशा स्थितीत गरिबांना आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना अव्वाच्या सव्वा येणारे वीज बिल भरणे अशक्य झाले आहे.
 देशात/राज्यात सर्वाधिक वीज निर्मिती विदर्भात होते. मात्र त्याचा फायदा उर्वरित महाराष्ट्राला अधिक होतो. त्यामुळे विदर्भातील आबालवृद्ध, स्त्री आणि पुरुषांना या नैसर्गिक आपत्तीत दिलासा मिळणे गरजेचे आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages