सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेगा एमएसएमई क्रेडिट आउटरीच कार्यक्रमात 30 कोटींचे कर्जवाटप - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, May 17, 2026

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेगा एमएसएमई क्रेडिट आउटरीच कार्यक्रमात 30 कोटींचे कर्जवाटप



अमरावती, दि. १८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :  सेंट्रल बँक इंडियाच्या वतीने एमएसएमई क्रेडिट आउटरीच कार्यक्रम शनिवार, दि.16 मे रोजी परतवाडा येथील कंचन टॉवर आणि अमरावती येथील पुंडलिक लॉन येथे पार पडला. यात 30 कोटींचे कर्जवाटप करण्यात आले.

परतवाडा येथील कार्यक्रम ग्राहक उत्पादन वितरण असोसिएशनचे अध्यक्ष पंकज गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. अमरावती येथील कार्यक्रमाला सीए असोसिएशनचे उपाध्यक्ष सीए संदीप सुराणा  उपस्थित होते. दोन्ही कार्यक्रमाला सेंट्रल बँकेच्या हेड ऑफिसचे जनरल मॅनेजर प्रीति सारस्वत उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थितांना सेंट्रल बँकेच्या कमी व्याज दरावर उपलब्ध असलेल्या कर्जाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

दोन्ही कॅम्पमध्ये 30 कोटी रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले. अमरावती क्षेत्रिय प्रमुख सुनील पाण्डेय यांनी प्रास्ताविकातून विविध योजनाची माहिती दिली. श्रीकांत पड़वाड़ यांनी सूत्रसंचालन केले. अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेड़ाऊ यांनी आभार मानले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages