मंत्री डॉ. अशोक उईके यांचा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, May 17, 2026

मंत्री डॉ. अशोक उईके यांचा दौरा

 

मंत्री डॉ. अशोक उईके 


अमरावती, दि. १८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :  आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके हे आज सोमवार, दि. 18 मे रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्यानुसार, डॉ. उईके यांचे  सकाळी 10.30 वाजता धारणी येथील शासकीय विश्रामगृहात आगमन होईल, त्यानंतर बासपाणी रोडवरील बालाजी मंगलम येथे सकाळी 11 वाजता धारणी व मेळघाट परिसरातील कुपोषण, सिकलसेल, थॅलेसेमिया, आणि क्षयरोग यांसारख्या गंभीर आरोग्यविषयक समस्या आणि त्यांवरील उपाययोजनांचा आढावा घेतला जाईल. दुपारी 12.30 वाजता अपर आयुक्त, आदिवासी विकास अमरावती आणि धारणी प्रकल्प अधिकारी कार्यालयाची आढावा बैठक घेतली जाईल. दुपारी 1.30 वाजता महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी विकास महामंडळ (नाशिक) आणि शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कामांचा आढावा व मेळाव्याला ते उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता खंडवा (मध्य प्रदेश) कडे रवाना होतील.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages