महाटेट 2025 परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण सुरू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, May 19, 2026

महाटेट 2025 परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण सुरू

 


अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण दि. 19 मे पासून सुरू करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांना हे प्रमाणपत्र 8 जून पर्यंत कार्यालयीन वेळेत प्राप्त करून घेता येणार आहे.

उमेदवारांनी प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज सादर केल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची रीतसर तपासणी केली जाईल. त्यानंतर तीन दिवसांनी उमेदवारांना प्रमाणपत्र वितरित केले जाईल. प्रमाणपत्र घेण्यासाठी येताना उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह छायांकित प्रती आणणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी प्रमाणपत्र घेण्यासाठी येताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्राची प्रत, महाटेट परीक्षेच्या गुणपत्रिकेची प्रत, डी. टी. एड. किंवा बी. एड. उत्तीर्ण गुणपत्रिका अथवा प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र, लागू असल्यास दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा अधिकृत पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा निवडणूक ओळखपत्र यांपैकी कोणतेही एक ओळखपत्र, या कागदपत्रांच्या प्रती आणि मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages