अमरावतीत दि. 22 मे रोजी मेगा रिटेल क्रेडिट आउटरीच कार्यक्रम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, May 19, 2026

अमरावतीत दि. 22 मे रोजी मेगा रिटेल क्रेडिट आउटरीच कार्यक्रम



अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेगा रिटेल क्रेडिट आउटरीच कार्यक्रमांतर्गत अमरावती येथे विशेष ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दि. 22 मे रोजी सायंकाळी 6 वाजता एमआयडीसी रोडवरील गुणवंत लॉन येथे होणार आहे.

या मेळाव्यात आकर्षक व सुलभ कर्ज योजनांची विशेष माहिती देण्यासाठी रिटेल क्रेडिट आऊटरीच कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात गृहकर्ज, वाहन कर्ज, व्यवसाय कर्ज, वैयक्तिक कर्ज, एज्युकेशन कर्ज, इतर किरकोळ कर्ज सुविधांची माहिती देण्यात येणार आहे. कार्यक्रमामध्ये तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, तात्काळ सल्ला आणि ऑन-द-स्पॉट प्राथमिक मंजुरीची सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच यावेळी इनप्रिन्सिपल सॅन्शन व चेक वितरण होणार आहे. मुख्य अतिथी म्हणून रिजनल प्रबंधक उपस्थित राहतील.

याबाबत अधिक माहितीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा आणि योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेड़ाऊ यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages