मंगळवारपासून प्रत्येक पंचायत समितीत रोजगार मेळावा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 22, 2026

मंगळवारपासून प्रत्येक पंचायत समितीत रोजगार मेळावा




अमरावती, दि.२३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमेंतर्गत मंगळवार, दि. 21 एप्रिलपासून दि. 8 मेपर्यंत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक पंचायत समितीमध्ये हा रोजगार मेळावा होणार आहे.

मेळाव्यामध्ये हैद्राबाद येथील गार्डियन ट्रेनिंग अकादमीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येते. कंपनीला आवश्यक असलेल्या पात्रतेच्या पदासाठी सदर कंपनीचे प्रतिनिधी लेखी परीक्षा घेऊन मुलाखती घेतील.

मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांसह उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066, 8983419799, 8605654025 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांनी बायोडाटा, पासपोर्ट फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages