सातरगावात 'एचपीव्ही' लसीकरण विशेष सत्र उत्साहात - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 15, 2026

सातरगावात 'एचपीव्ही' लसीकरण विशेष सत्र उत्साहात

 


अमरावती, दि. १६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सातरगाव येथे मुलींमधील गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यानाठी 'एचपीव्ही' नभीकरण विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले.

दाभा उपकेंद्र अंतर्गत गावातील 7 पात्र लाभार्थी मुलींनी लसीकरणाचा लाभ घेतला. भविष्यात होणाऱ्या कर्क रोगाला आळा घालण्यासाठी ही लस अत्यंत प्रभावी आणि फायदेशीर असल्याचे मत यावेळी उपस्थित पालकांनी व्यक्त केले. लसीकरणापूर्वी लाभार्थी पालकांचे समुपदेशन करण्यात आले. यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रियंका धानुका, आरोग्य सेवक राजेंद्र चकुले, अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुजा ब्राम्हणे यांचे सहाकार्य लाभले.

मोहिमेसाठी आरोग्य सहायिका अनिता मुळे, गटप्रवर्तिका अनिता मेश्राम. साधना भेंडे, राजेश डिबे आणि मनोज धरपाळ यांनी परिश्रम घेतले. तसेच आशा स्वयंसेविका संध्या ठाकरे, विना शेजवे आणि सिंधू कलसाईत यांचे सहकार्य लाभले. लसीकरणानंतर सर्व लाभार्थी मुलींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे व वैद्यकीय अधिकारी डॉ. राजीव धोत्रे वाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages