जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उद्घाटन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 15, 2026

जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उद्घाटन

 



अमरावती, दि. १६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जलसंपदा विभागातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026चे उद्घाटन नुकताच उर्ध्व वर्धा कॉलनीतील मनोरंजन सभागृहामध्ये पार पडला. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ज. द. टाले अध्यक्षस्थानी होते.

यावेळी अधीक्षक अभियंता योगेश दाभाडे, अधिक्षक अभियंता मनिष राजभोज उपस्थित होते. कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत यांनी या पंधरवड्यामध्ये जलसंपदा विभागाने करावयाच्या कामामध्ये कालवा स्वच्छता मोहिम, पाणीपट्टी वसुली, पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण, महानगरपालिका व ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्यक्ष पाणी वापराचा जललेखा तयार करणे, अनधिकृत बांधकाम हटविणे, तसेच जलसंपदा विभागाच्या जमिनीच्या मालमत्तांचे स्थळ निश्चिती करणे, जलसंपदा अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण, स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, शेतकरी, पाणी वापर संस्था चर्चासत्र ही कामे प्राधान्यक्रमाने करण्याबाबतचे नियोजन सादर केले.

यावेळी उर्ध्व वर्धा, सपन, चंद्रभागा, शाहनुर, पुर्णा या प्रमुख नद्यांचे जलपुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सहायक अभियंता श्रध्दा कथलकर यांनी सूत्रसंचालन केले. विवेक चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी मालमत्ता उपविभागाचे उपविभागीय अभियंता श्री. मुंडे, सुयोग वानखेडे यांनी पुढाकार घेतला.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages