बुद्ध-भीम गीतांची बहारदार मैफील रंगली. *समाज कल्याण विभागाचा पुढाकार - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, April 19, 2026

बुद्ध-भीम गीतांची बहारदार मैफील रंगली. *समाज कल्याण विभागाचा पुढाकार


अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून आयोजित 'सामाजिक समता सप्ताहा' निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. समाज कल्याण विभाग, अमरावतीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे बुद्ध-भीम गीतांच्या बहारदार मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात शुक्रवार, दि. 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर ते समता, न्याय आणि बंधुतेचे प्रणेते होते. समाजातील अस्पृश्यता, जातीयता आणि भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. महिला आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन करत त्यांनी कायद्याच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची चळवळ उभी केली. अशा या थोर युगपुरुषाच्या विचारांचे स्मरण करणे आणि त्यांच्या कार्याला संगीतमय मानवंदना देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ठरला.

समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त माया केदार, सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी नागरिकांना या प्रबोधनात्मक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन केले होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages