आधारभूत खरेदी योजनेतंर्गत ज्वारी, मका खरेदीची नोंदणी प्रक्रिया सुरु - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, April 19, 2026

आधारभूत खरेदी योजनेतंर्गत ज्वारी, मका खरेदीची नोंदणी प्रक्रिया सुरु

 


*शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन

            अमरावती, दि. २०(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम 2025-26 अंतर्गत ज्वारी, मका खरेदी करण्यासाठी किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत दहा खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.

अचलपूर, मोर्शी, वरूड, नांदगाव खंडेश्वर, चांदुर बाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चांदूर रेल्वे, तिवसा, धामणगाव या केंद्राच्या तालुका खरेदी विक्री संघाचा समावेश राहील. हमी भावाने खरेदीसाठी नोंदणी कालावधी 30 एप्रिल 2026 पर्यंत राहील. तसेच तुर, चना पिकाच्या खरेदीसाठी आवश्यक बारदाना लवकरच उपलब्ध केल्या जाईल व खरेदी केंद्र पूर्ववत कार्यान्वित होतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित मुंबईचे संचालक नितीन हिवसे यांनी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.

 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages