महिलांनी अर्थकारणाला गती द्यावी -जिल्हाधिकारी आशिष येरेकर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, April 7, 2026

महिलांनी अर्थकारणाला गती द्यावी -जिल्हाधिकारी आशिष येरेकर





अमरावती, दि. 8 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : महिला बचतगटांसाठी एक लाख रूपयांचा निधी देण्यात येत आहे. हा निधी शासनाला परत करावा लागणार नाही. त्यामुळे महिलांनी या निधीचा उपयोग उद्योगाच्या विकासासाठी करावी. यामुळे अर्थकारणाला गती मिळणार असून इतरांना प्रेरणा मिळेल, असे मत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केले.

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरुषांचा जेंडर सेंसीटिव्ह रोल मॉडेल म्हणून सुधारक सन्मान पुरस्कार जिल्हाधिकारी यांच्या शुभ हस्ते काल देण्यात आला. तसेच बचतगटांना एक लाख रूपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय गट, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी ऋषीकेश घ्यार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, विना परतावा देण्यात आलेल्या निधीचा बचतगटांनी निट उपयोग करावा. उद्योगासाठी ही पायाभरणी असून ही मोलाची रक्कम राहणार आहे. या निधीचा चांगला उपयोग करून यशकथा निर्माण कराव्यात. महिला बचतटांसाठी विविध स्टार्टअप कार्य करीत असून त्यांच्याशी जुळावे. यामुळे मार्केटींगची मदत होणार आहे. जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेतील लाभार्थींची पतसंस्था सुरू करण्यात आली आहे. तसेच महिलांची विविध कार्यकारी सहकारी संस्था सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे महिला सक्षमीकरणाला बळकटी मिळणार असल्याचे सांगितले.

डॉ. वानखडे यांनी प्रास्ताविक केले. पुनम सोनार यांनी सूत्रसंचालन केले. श्री. घ्यार यांनी आभार मानले. यावेळी जनाराव खंडारे, माधान, ता. चांदूर बाजार, दत्ता कडूकर, तिवरा, ता. धामणगाव, निलेश कोहळे, सुरळी, ता. वरुड यांनी जेंडर सेंसीटिव्ह रोल मॉडेलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच शक्ती महिला बचतगट, भिलटेक, ता. चांदूर रेल्वे, स्वामी समर्थ महिला बचतगट, शिराळा, ता. अमरावती, आदर्श महिला बचतगट, पूर्णानगर, ता. भातकुली या बचतगटांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages