पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत तरुणांसाठी नामवंत कंपन्यांत विद्यावेतनासह प्रशिक्षणाची संधी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, April 7, 2026

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत तरुणांसाठी नामवंत कंपन्यांत विद्यावेतनासह प्रशिक्षणाची संधी

 




अमरावती, दि. ०८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026' अंतर्गत आता देशातील पहिल्या 500 नामवंत कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेचा तिसरा टप्पा आता अधिक व्यापक स्वरूपात सुरू झाला असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

या योजनेमध्ये उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये 10 वी, 12 वी उत्तीर्ण, आयटीआय प्रमाणपत्रधारक, पॉलिटेक्निक डिप्लोमा तसेच पदवीधर उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आता पदव्युत्तर आणि एमबीए पूर्ण केलेले विद्यार्थी देखील या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

निवड झालेल्या उमेदवारांना विद्यावेतन  दरमहा 9 हजार रुपये मिळणार आहे. यापैकी 8 हजार 100 रुपये सरकारकडून थेट बँक खात्यात जमा होतील, तर 900 रुपये संबंधित कंपनीकडून दिले जातील. याशिवाय, रुजू होताना 6 हजार रुपयांचे एकरकमी सानुग्रह अनुदान देखील दिले जाणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 6 ते 9 महिन्यांचा असेल, ज्यानंतर उमेदवारांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.

ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी आहे, ते या योजनेसाठी पात्र नसतील. तसेच, आयआयटी, आयआयएम यांसारख्या उच्च संस्थांमधील पदवीधर या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. इच्छुकांनी आपली नोंदणी केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर pminternship.mca.gov.in येथे पूर्ण करावी, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages