(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :
"हा संतांचा महाराष्ट्र आहे आणि आपल्या संतांनी आपल्याला नेहमीच विवेकी भक्तीची शिकवण दिली आहे. त्यामुळे महिलांनी देवावर श्रद्धा जरूर ठेवावी, परंतु कोणत्याही भोंदू बाबांच्या मागे लागून अंधश्रद्धा बाळगू नका," असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांनी केले.
सुशिक्षितांनी बहिणाबाईंचा वारसा जपायला हवा
आपल्या कीर्तनातून समाजप्रबोधन करताना शिवलीलाताई म्हणाल्या की, "आजच्या काळात महिला एखादा बुवा किंवा बाबा दिसला की लगेच त्यांच्या मागे लागतात, हे चुकीचे आहे. आपल्या पतीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबाला स्वतःचे समर्पण करू नका." यावेळी त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ओळींचा दाखला देत म्हटले की, ज्या काळात बहिणाबाईंनी 'नको नको ज्योतिषा माझ्या दारी येऊ, माझं ज्योतिष कळते मला नसत्या थापा देऊ' असे ठणकावून सांगितले, ते एका अशिक्षित स्त्रीला कळले; मात्र आजच्या सुशिक्षित महिलांना ते का समजत नाही, याचे नवल वाटते.हा संतांचा महाराष्ट्र आहे.आमच्या संतांनी विवेकी भक्ती सांगितली तेव्हा आपल्या मर्यादा सांभाळा.असे प्रतिपादन ह.भ.प.शिवलीलाताई पाटील यांनी ब्रा.थडी येथे आयोजित बजरंगदल व बसव फाउंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आला होता. किर्तन महोत्सवात बोलत होत्या.

इतिहासाचे दाखले आणि मार्गदर्शन
शिवलीलाताईंनी आपल्या रसाळ वाणीतून छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर संभाजी महाराज यांच्या जीवनातील आदर्श प्रसंग सांगून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. भक्ती करताना आपल्या मर्यादांचे भान राखणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी ओघवत्या भाषेत पटवून दिले.

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरती राजेश वानखडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार देवेंद्र भुयार,(माजी आमदार) यशवंत केवलराम काळे, प्रकाश मारोडकर, राहुल नावंदे (बसव फाउंडेशन), प्रशांत जाधव (ठाणेदार), रमेश तायवाडे, अभिषेक हजारे, श्याम मुळे, संगम सरकारे आणि अतुल रघुवंशी उपस्थित होते.

कार्यक्रमाची यशस्वीता
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन कुलदीप काळे यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गोलू पोकळे, विकी टेंभरे, मोंटू दाभाडे, अतुल दारोकर, निखिल भडके, सतीश धामळे तसेच बजरंग दलाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. या कीर्तन सोहळ्याला ब्राम्हणवाडा थडी व परिसरातील भाविकांनी, विशेषतः महिलांनी मोठी गर्दी केली होती.

Post a Comment
0 Comments