"शिरजगावात श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना; शतकोत्तर तपपूर्तीनिमित्त धार्मिक उत्सवांची मांदियाळी!"
चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील सटवाई पुण्यातील श्रीराम मंदिर संस्थानला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंदिरात १९ मार्च ते २७ मार्च दरम्यान विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख कार्यक्रम आणि वेळापत्रक:
प्राण प्रतिष्ठापना सोहळा: २१ मार्च रोजी सकाळी ८ ते १०:३० या वेळेत श्रीराम प्रभूंच्या नवीन मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली जाईल.
दैनिक कार्यक्रम (१९ ते २७ मार्च):
सकाळी ५ ते ६:३०: काकड आरती.
सकाळी ९ ते १२: श्रीराम चरित मानस ग्रंथाचे सामूहिक पारायण.
दुपारी २ ते ५: श्रीराम कथा निरूपण (वक्ते: ह.भ.प. नंदकिशोर महाराज खरात, श्रीक्षेत्र नेवासे).
रात्री ८ ते १०: कीर्तन सोहळा.
दिवसनिहाय विशेष विधी:
दिनांक वेळ कार्यक्रम
१९ मार्च पहाटे ५:५३ गुढी उभारणी, तीर्थस्थापना, मंडप स्थापना आणि देवता आवाहन.
दुपारी ४:०० श्रीराम प्रभूंच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा (नगर प्रदक्षिणा).
२० मार्च सकाळी ११:३० अग्नी स्थापना, वास्तू पूजन, जल यात्रा, जलाधिवास आणि देव स्थापना विधी.
संध्याकाळी ५:०० फलाधिवास व पुष्पाधिवास विधी.
२१ मार्च सकाळी ८ ते ९:३० श्रीराम प्रभूंची मूर्ती स्थापना.
सकाळी ९:३० ते ११ भाव प्रतिष्ठा व भजन सोहळा.
२२ मार्च सकाळी ८ ते १२ १०८ यजमानांद्वारे शिखर कळस पूजन.
दुपारी ४:०० श्रीराम-जानकी विवाह सोहळा.
२३ मार्च सकाळी लक्ष्मी नारायण याग.
दुपारी ५:०० कळसारोहण सोहळा.
२४ मार्चदुपारी ५:००ध्वज स्थापना सोहळा.
कीर्तन सेवा देणारे महाराज:
या सोहळ्यात ह.भ.प. योगेश महाराज गोरे, ह.भ.प. शरदचंद्र महाराज बंड, ह.भ.प. श्रीराम महाराज गोसावी, ह.भ.प. कैलास महाराज येवले, ह.भ.प. संजय महाराज अलोणे, ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे आणि ह.भ.प. सारंगधर महाराज गोळेगांवकर यांची कीर्तने होतील.
आवाहन: श्रीराम मंदिर संस्थानतर्फे या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन परिसरातील भाविकांना करण्यात आले आहे.या सोहळ्यामध्ये जिल्ह्याचे खासदार, अचलपूर मतदार संघाचे आमदार व राजकीय नेत्यांची उपस्थितीती राहणार आहे.
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
Star Mag Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Wire Templates Developers. Simple and elegant themes for making it more comfortable