डॉ.मंजुषा दौलतराव सागर यांना स्वयंसिध्दा गौरव पुरस्कार 2026 प्रदान - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, March 16, 2026

डॉ.मंजुषा दौलतराव सागर यांना स्वयंसिध्दा गौरव पुरस्कार 2026 प्रदान


अमरावती दि. १७ ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क :-

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच अमरावती यांच्यावतीने जागतिक महिला दिन कार्यक्रम 10 मार्च रोजी संपन्न झाला. कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा या अंतर्गत  कांचन रिसॉर्ट ,वलगाव रोड ,अमरावती येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.मंजुषा दौलतराव सागर  यांना स्वयंसिद्धा गौरव पुरस्कार सम्मान 2026 प्रदान करण्यात आला .त्या स्मॉल वंडर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वडकी तालुका राळेगाव येथे प्राचार्य या पदावर कार्यरत आहेत.  कार्यक्रमाच्या अध्यक्षा भारतीय जनता पार्टी सदस्य शोभना देशमुख तर विशेष अतिथी सुलभाताई खोडके आमदार अमरावती यांना निमंत्रित करण्यात आले होते .प्रमुख अतिथी म्हणून प्रीती देशमुख प्रकल्प संचालक जी प्रा विकास यंत्रणा डॉ.अनुभूती पाटील स्त्रीरोग तज्ञ राजश्री जढाळे संचालक महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक अक्षरा लहाने विदर्भ कार्याध्यक्ष महिला मंच, श्री. मनोहर सुने राष्ट्रीय अध्यक्ष ,अखिल  भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, कैलास बापू देशमुख, राष्ट्रीय संघटक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, युसुफभाई खान, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, राजेंद्र भुरे राष्ट्रीय सरचिटणीस , अशोकराव पवार राष्ट्रीय चिटणीस ,प्रदीप जोशी राष्ट्रीय उपाध्यक्ष , सौ. सुरेखा दामेधर  अध्यक्ष विदर्भ पश्चिम महिला मंच  मान्यवरांच्या हस्ते सत्कार सर्वांचा सत्कार करण्यात आला.  क्रीडाक्षेत्र उद्योग क्षेत्र ,पत्रकारिता, शिक्षण क्षेत्र आरोग्यसेवा ,कलाक्षेत्र ' आरोग्य . संगीतक्षेत्र ,लेखन क्षेत्र , अशा विविध क्षेत्रातून एकूण 15 महिलांचा सत्कार यावेळी घेण्यात आला. आदिती मेहता यांच्या क्लासिकल नृत्याने कार्यक्रमाला आणखीच बहर आला .गौरी सतके यांनी सत्यम शिवम सुंदरा गीत सादर केले. कार्यक्रमाचे संयोजन व संचालन कांचन मूरके अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच अध्यक्ष यांनी केले. तर कार्यक्रमासाठी राजेंद्र ठाकरे यांचे मोलाचे  मार्गदर्शन व सहकार्य लाभले  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ मंजुषा सागर यांनी केले कार्यक्रमास विविध पत्रकार तसेच अखिल भारतीय पत्रकार परिषदेतील अनेक पदाधिकारी व पत्रकार मंडळींनी कार्यक्रमास हजेरी लावली होती

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages