ब्राम्हणवाडा थडी_
विलास खाजोने(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
दि.१७
..जेव्हा एकिकडे आदिलशाही, निजामशाही तर कुतुबशाही यांच्या अनन्य अत्याचारात भरडत असलेली सामान्य जनता बघितली तेव्हा या यवन सांम्राज्यातुन या रयतेला मुक्त करण्यासाठी शिवबांनी हाती तलवार घेतली.हे कार्य एकट्याला शक्य नव्हतं म्हणून अठरा पगड जातिंना सोबत घेऊन शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली.ते राज्य केवळ रयतेच राज्य होतं.असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवकथाकार व किर्तनकार ह.भ.प.कबिर महाराज अख्तर यांनी गजानन नगरी ब्राम्हणवाडा थडी येथे शिवजयंती उत्सवामध्ये शिवचरित्र सांगताना केले.
काही लोकं म्हणतात ते अवतार नव्हते परंतू शिवबा होते म्हणून आज आमच्या मंदिरात व देव्हाऱ्यात देव आहेत हे विसरून चालणार नाही.असेही ते म्हणाले . त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्करराव टोम्पे ,उद्घाटक बाळासाहेब आकोटकर हे तर प्रमुख अतिथी मदन भाटे, बाळासाहेब सोनार, क्रांती काळे, ठाणेदार प्रशांत जाधव, केशवराव दाभाडे, अशोकराव बनसोड,सुरेश बदुकले, वासुदेव परांजपे, श्रीरामपंत सोनार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकाश दाभाडे अध्यक्ष छत्रपती बहुउद्देशीय संस्था यांनी केले त्यात संस्थेचे मुख्य उद्दिष्ट समजावून सांगितले.कार्यक्रमाचे संचालन कु.साक्षी पवार यांनी केले.त्यावेळी साक्षी पवार व बि.एस.एफ मध्ये नव्याने रुजू झालेल्या कु.मनिषा आमझरे व मंगेश बदुकले यांच्या आई वडिलांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास गावातुन व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी हजारोच्या संख्येने हजेरी लावली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश दाभाडे व छत्रपती बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आहे.
Post a Comment
0 Comments