सामाजिक न्यायच्या राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती विभागाला सर्वसाधारण विजेतेपद - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, February 25, 2026

सामाजिक न्यायच्या राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती विभागाला सर्वसाधारण विजेतेपद



अमरावती, दि. २६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राज्यस्तरीय क्रीडा व कला स्पर्धेत अमरावती विभागाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.

अमरावती विभागाच्या टेबल टेनिस महिलामध्ये प्रथम क्रमांक स्नेहल काळवाघे, बॅडमिंटन पुरुष दुहेरी मध्ये निरज चारोळे, प्रथम डुलगज, गोळा फेक महिलामध्ये प्रथम रुपाली अपराजित, गोळा फेक पुरुषमध्ये प्रथम ज्ञानेश्वर साळवे, कबड्डी पुरुष गटात अमरावती विभाग प्रथम, व्हॉलीबॉल महिला गटात अमरावती विभाग प्रथम, रस्सीखेच महिला गटात अमरावती विभाग प्रथम, क्रिकेट पुरुष व महिला गटात प्रथम क्रमांक, समूह नृत्य अमरावती विभाग प्रथम, भूमिका अभिनयात शिवचरित्र्य सादरीकरणामध्ये अमरावती विभाग प्रथम ठरला आहे. तसेच प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांनी अभिनयामध्ये साकारलेली राजमाता जिजाऊची भूमिका अत्यंत प्रभावी ठरली.

शिखा गरकल-केदार हिने बालशिवाजी, पवन साबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली. अमरावती विभागाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदिप कांबळे, आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे यांनी स्वागत केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages