कृषी पुरस्कारासाठी ऑनलाईन सुविधा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, February 25, 2026

कृषी पुरस्कारासाठी ऑनलाईन सुविधा



*शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. २६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा कृषी विभागामार्फत दरवर्षी सन्मान करण्यात येतो. यावर्षीपासून या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य शासनातर्फे डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मची डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार देण्यात येतात.

यापूर्वी कृषी पुरस्कार प्रस्तावासाठी ऑफलाईन पद्धती होती. यात इच्छुक शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व प्रभावी करण्यासाठी कृषी विभागातर्फे पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावर कृषी पुरस्कार टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुरस्कारासाठी एकदा अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा देण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच अर्जाच्या टप्प्याची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळणार आहे. कृषी आयुक्त यांनी सन २०२५ पासूनचे विविध कृषी पुरस्कार अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करण्याच्या सूचना केल्या आहे.

पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था, गट यांनी कृषी पुरस्कार सन २०२५ करीता संकेतस्थळावरील कृषी पुरस्कार टॅबद्वारे तात्काळ अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी आवाहन केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages