वसतिगृह प्रवेशासाठी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, February 25, 2026

वसतिगृह प्रवेशासाठी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


*इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 10 मार्च अंतिम मुदत

            अमरावती, दि.२६(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 10 मार्चपूर्वी अर्ज करावे लागणार आहे.

            बारावीनंतरच्या बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय वसतिगृहामध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे.

मुलांनी इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह, अग्रवाल टॉवर, जाफरीन प्लॉट, आदर्श होटेलजवळ, कॉटन मार्केट रोड, अमरावती. तसेच मुलींनी इतर मागास बहुजन कल्याण मुलींचे शासकीय वसतिगृह, ब्लॉक ए, राम लक्ष्मण संकुल, तिसरा मजला, रामपूरी कॅम्पजवळ, विलासनगर चौक, अमरावती या वसतिगृहामध्ये सादर करावेत.

             12 वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांतीन विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी 11 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीतील पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत 12 मार्च ते 20 मार्च 2026 पर्यंत राहील.

अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण अमरावती, सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयाचे मागे, चांदुर रेल्वे रोड, अमरावती, तसेच ई-मेल dobbwoamravati@gmail.com यावर संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक सरीता बोबडे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages