डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धेत शर्विल अनिल भगत यशस्वी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, February 28, 2026

डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धेत शर्विल अनिल भगत यशस्वी

 


जळगाव जामोद  दिनांक २८(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

          बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ ( जीबीएसटी असोसिएशन )यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर आयोजित डॉक्टर  बालवैज्ञानिक परीक्षा घेण्यात येते. राष्ट्रीय  स्तरावर घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत स्थानिक जळगाव जामोद येथील दि न्यू इरा हायस्कूल येथे वर्ग सहावीत शिकणारा शर्विल अनिल भगत यांने उत्तुंग यश मिळवत शेवट च्या  फेरीत मजल मारली आहे.

                 राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत वर्ग सहा मधून एकूण एक लाख चार हजार विदयार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी शेवटच्या फेरी करिता ४२९ विद्यार्थी  निवडल्या गेलेत . त्यामध्ये शर्विल निवडला गेलेला आहे. त्याला पुढील फेरी करिता एक शोध निबंध सादर करून त्या संदर्भात त्याला दोन  मुलाखती द्यायच्या  आहेत .पुढील सर्व फेऱ्या ह्या मुंबई येथे होणार आहेत .

            सदर परीक्षेमध्ये शोधनिबंधाकरिता त्यांने कम्पॅरिझन बिटवीन केमिकल अँड ऑरगॅनिक फार्मिंग हा विषय घेतला आहे . या शोधनिंबधामध्ये शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या अनुभवातून रासायनिक शेती व सेंद्रिय शेती, फायदा, खर्च ,उत्पादनाचा वेग आणि बाजारपेठ इत्यादी माहिती घेऊन त्यावर शोध निंबंध इंग्रजी माध्यमातून  सादर करणार आहे. त्याची पुढील परीक्षा मुंबई येथे 15 मार्चला होणार आहे ह्या परीक्षेत मुलाखतीकरिता पात्र झालेला स्थानिक दि न्यू इरा हायस्कूल शाळेचा हा आतापर्यंतचा पहिलाच विद्यार्थी ठरला आहे . करिता त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages