डॉ. मोनाली टिंगणे यांना संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, February 28, 2026

डॉ. मोनाली टिंगणे यांना संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान




शिरजगाव कसबा दि. २८  सौ. विद्या दाभाडे (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) 

संगणक विज्ञान व अभियांत्रिकी शाखेत 'ई-कॉमर्स अनुप्रयोगांसाठी मशिन लर्निंग आधारित सेंटिमेंट अ‍ॅनालिसिस'(Sentiment Analysis for E-commerce Applications using Machine Learning) या विषयावर संशोधन साधन करून डॉ. मोनाली टिंगणे यांनी पीएच.डी. (Ph.D.) पदवी संपादन केली आहे.त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.

त्यांच्या संशोधनात प्रगत मशिन लर्निंग तंत्रज्ञानाच्या सहायता ने ग्राहकांच्या अभिप्रायांचे सकल विश्लेषण करण्यात आले आहे. ऑनलाइन व्यापारातील निर्णयप्रक्रिया अधिक अचूक व परिणामकारक करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. या संशोधनामुळे ई- कॉमर्स क्षेत्रातील डेटा विश्लेषण व ग्राहक वर्तन अध्यासाला नवे दिशादर्शन मिळणार असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले. या यशाबद्दल डॉ. टिंगणे यांना मार्गदर्शक डॉ. एम. एस. अली यांचे मौलाचे मार्गदर्शनबद्दल आभार मानले. तसेच संशोधन प्रवासात पती श्री. रुषभ भगत यांची खंबीर साथ आणि आई- वडिलांसह कुटुंबीयांचे प्रोत्साहन हेच प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी सांगितले.  काजळी (देऊरवाडा)डॉ. मोनाली टिंगणे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरां तून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages