फरिदाबादमध्ये ३९ व्या 'सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तशिल्प मेळ्या'चा दिमाखदार सोहळा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, February 8, 2026

फरिदाबादमध्ये ३९ व्या 'सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तशिल्प मेळ्या'चा दिमाखदार सोहळा


हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय

  हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन
दि. ९ फरिदाबाद (हरियाणा):
देशातील हस्तकला आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणाऱ्या जगप्रसिद्ध ३९ व्या 'सूरजकुंड आंतरराष्ट्रीय आत्मनिर्भर हस्तशिल्प मेळ्या'चे उद्घाटन ५ फेब्रुवारी २०२६ रोजी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय आणि मुख्यमंत्री नायब सिंह सैनी उपस्थित होते.
आत्मनिर्भर भारत संकल्पना: यावर्षीचा मेळावा पूर्णपणे 'आत्मनिर्भर हस्तशिल्प' या संकल्पनेवर आधारित आहे, ज्यामध्ये स्थानिक कारागिरांच्या कौशल्याला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे 
  या मेळाव्यात भारतासह जगातील ३० पेक्षा जास्त देश सहभागी झाले असून त्यांच्या कला आणि संस्कृतीचे सादरीकरण करत आहेत.
  मेळ्यात हजारो हस्तकला स्टॉल्स, अस्सल प्रादेशिक खाद्यपदार्थ आणि विविध राज्यांचे लोककला प्रकार सादर केले जात आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी विशेष मोबाईल ॲप आणि 'डिजिटल पेमेंट' सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे 
पर्यटक आपली तिकिटे Surajkund Mela Authority च्या अधिकृत पोर्टलवरून किंवा बुकिंग पार्टनर BookMyShow वरून ऑनलाइन बुक करू शकतात.
हा मेळावा पर्यटकांसाठी ५ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सकाळी १०:३० ते रात्री ८:३० या वेळेत सुरू राहणार आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages