प्राचार्य बशिष्ठ चौबे यांच्यावर गंभीर आरोप; प्राध्यापक सत्येंद्र गडपायले यांनी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात एनसीआर दाखल केली - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, February 8, 2026

प्राचार्य बशिष्ठ चौबे यांच्यावर गंभीर आरोप; प्राध्यापक सत्येंद्र गडपायले यांनी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात एनसीआर दाखल केली


सारडा महाविद्यालयातील वाद चव्हाट्यावर; प्राचार्यांच्या अर्वाच्य भाषेला कंटाळून प्राध्यापक एकवटले

दि. ९ अंजनगाव सुर्जी:

श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयातील प्राचार्य बशिष्ठ चौबे यांच्याविरोधात गेल्या नऊ वर्षांपासून मानसिक व आर्थिक शोषण, महिला प्राध्यापकांशी अर्वाच्य व अपमानास्पद भाषेत वागणूक, तसेच धमकीवजा वर्तन केल्याचे गंभीर आरोप करत प्राध्यापक सत्येंद्र बस्तीराम गडपायले यांनी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात एनसीआर दाखल केली आहे. ही तक्रार भारतीय नागरी सुरक्षा संहिता (NCR) अंतर्गत कलम ३५२, ३५१(२) व १३१ नुसार ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता दाखल करण्यात आली.

प्रकरणाचे गांभीर्य:

सेवानिवृत्त प्राचार्य बशिष्ठ चौबे यांच्यावर महाविद्यालयाच्या गेटला कुलूप लावणे आणि प्राध्यापकांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे. त्यांच्या धमकीवजा आणि अपमानास्पद वक्तव्यांमुळे प्राचार्य चौबे व इतर प्राध्यापकांमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाला. या प्रकारामुळे शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून प्रशासकीय कारभाराकडे लक्ष लागले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages