दलित वस्ती सुधार योजनेतील कामांना गती मिळणार - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, February 24, 2026

दलित वस्ती सुधार योजनेतील कामांना गती मिळणार



*670 विकासकामांवरील स्थगिती उठवली

अमरावती, दि. २४  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी सन 2025-26 या वर्षाकरिता मंजूर करण्यात आलेल्या 670 विकासकामांवरील स्थगिती उठवण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार कामांमध्ये बदल करून विकासकामे करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना वेग मिळणार आहे.

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजनेंतर्गत सांडपाणी निचऱ्यासाठी नाली, पाणीपुरवठा, सिमेंट रस्ते, एलईडी लाईट आणि पेविंग ब्लॉक बसवणे यांसारख्या 670 कामांची निवड करण्यात आली होती. मात्र, या कामांमध्ये रस्ते आणि पेविंग ब्लॉकच्या कामांचे प्रमाण जास्त असल्याने ही कामे बदलविण्याची सूचना पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी केली होती. तसेच सांडपाणी व्यवस्थापन, गटार व्यवस्था आणि पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, गट विकास अधिकाऱ्यांनी जुन्या यादीतील 112 कामांमध्ये बदल करून नवीन कामांचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे आता 670 विकासकामे सुरू होणार आहे.

या कामांमध्ये रस्ते आणि पेविंग ब्लॉकऐवजी आता आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित कामांमध्ये गटारे, पाणीपुरवठा यावर भर दिला जाणार आहे. सर्व कामांचे जिओ टॅगिंग आणि छायाचित्र पालकमंत्र्यांसमोर सादर करण्यात आले आहेत. बदललेल्या 112 कामांचे प्रस्ताव ग्रामपंचायत ठराव, प्रमाणपत्रे आणि अंदाजपत्रकासह तातडीने प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी. एम. पुंड यांनी केले आहे.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages