जिल्हाधिकाऱ्यांकडून राणीघाट अपघातातील जखमींची विचारपूस - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, February 24, 2026

जिल्हाधिकाऱ्यांकडून राणीघाट अपघातातील जखमींची विचारपूस



अमरावती, दि. २४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :
धारणी तालुक्यातील राणीघाटामध्ये झालेल्या अपघातातील पाच जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांची जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी भेट घेऊन अपघात आणि प्रकृतीची माहिती घेतली. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याची सूचना केली.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार आदी उपस्थित होते.

अपघातामधील अर्चना दारासिंगे, रा. कंजोली, गेरुबाई देवळे, रा. मोठेखेडे, रिता राठोड, रा. सिनंबद, देवा धांडे, रा. कंजोली, मुनी दहीकर, रा. कंजोली, विकेश दहीकर, सालाई, सर्व ता. धारणी यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील रिता राठोड यांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सुरवातीला अपघात कक्षातील जखमी भुनी दहीकर यांना भेट दिली. यावेळी त्यांनी नातेवाईकांकडून अपघाताची माहिती घेतली. अपघात कशाप्रकारे घडला, वाहनात किती नागरिक होते, अपघाताचे कारण आदींची माहित घेण्यात आली. त्यानंतर अपघातातील अर्चना दारसिंगे या गर्भवती महिलेची भेट घेतली. अपघातामुळे माता व बाळ दोन्ही सुरक्षित ठेवण्यासाठी उपचार करावेत. त्यांची तब्येत पूर्ण बरी झाल्यानंतरच रूग्णालयातून सुट्टी द्यावी, अशा सुचना केल्या. शल्यचिकित्सा कक्षात दोन जणांवर शस्त्रक्रीया करण्यात येत आहे. याठिकाणीही श्री. येरेकर यांनी भेट देऊन जखमींच्या नातेवाईकांकडून माहिती घेतली.

राणीघाटातील अपघाताला वाहनचालक कारणीभूत आहेत. वाहनचालकाने वाहन सुस्थितीत नसताना माल आणि प्रवासी जादा प्रमाणात भरले. तसेच धावत्या वाहनामध्येच बिघाड झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यातील जमखींची विशेष उपचार देऊन मृत्यू होऊ नये, याची काळजी घ्यावी. अपघातातील जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे जखमींनी पूर्ण उपचार घेऊन घरी जावे. जखमींवर योग्य उपचार करावेत. आवश्यकता भासल्यास खासगी डॉक्टरांची सेवा घेण्यात यावी. जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांनीही उपचारासाठी सहकार्य करावे, असे श्री. येरेकर यांनी सांगितले.

मेळघाटमध्ये झालेल्या अपघातातील वाहनचालकांवर सक्त कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांना दिल्या.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages