Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २५ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे करणार राष्ट्रीय आरोग्य मेळावा - २०२६ चे उद्घाटन




  अमरावती दि. २५:  भारत सरकारचे आयुष मंत्रालयअखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 25 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे चार दिवसांचा "राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026" आयोजित करण्यात आला आहे.

          औषधी वनस्पती लागवड आणि कृषी वनीकरणाद्वारे आयुष औषध प्रणालींबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रदान करणे आणि शेतकऱ्यांसाठी उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण करणे हे या मेळाव्याचे उद्दिष्ट आहे.

          राष्ट्रीय आरोग्य मेळावा- 2026 चे उद्घाटन शुक्रवार 25 फेब्रुवारी 2026 रोजी मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन समारंभ संत गजानन महाराज संस्थानच्या विसावा मैदानावर होणार आहे. उद्घाटन समारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार व केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आणि इतर अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

          या संपूर्ण मेळाव्यात नागरिकांना आयुर्वेदयोग आणि निसर्गोपचारयुनानीसिद्धसोवा रिग्पाहोमिओपॅथी आणि इतर पारंपारीक आरोग्यसेवा शाखांसह विविध आयुष प्रणालीं मार्फत मोफत आरोग्य तपासणीवैद्यकीय सल्ला आणि औषधे घेण्याची संधी मिळेल.

          आयुष क्षेत्रातील उत्कृष्ट उत्पादन पद्धतीगुणवत्ता मानके आणि अलीकडील संशोधन प्रदर्शित करण्यासाठी अनेक प्रतिष्ठित आयुष औषधनिर्माण आणि वेलनेस  कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर दैनंदिन आरोग्य गरजांसाठी औषधी वनस्पती आणि साध्या घरगुती उपचारांचे समर्पित प्रदर्शन देखील या मेळाव्यात भरवले जाणार आहे.

         बुलढाणा जिल्हा आणि आसपासच्या भागातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा शाश्वत आणि लाभदायी स्रोत म्हणून कृषी वनीकरण आणि औषधी वनस्पतींची लागवड स्वीकारण्यास प्रोत्साहन देणारा एक विशेष उपक्रम यावेळी आयोजित करण्यात आला असून,तो या राष्ट्रीय आरोग्य मेळावा -2026 चे एक प्रमुख आकर्षण आहे. दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3.00 वाजता शेगाव येथील विसावा परिसरात "आयुर्वेदिक शेतीउत्पादन आणि विपणन" या विषयावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

          या महामेळाव्यातशेतकऱ्यांना वनोत्पादनांवर  आधारित आणि औषधी पिकांची लागवडप्रक्रियामूल्यवर्धन आणि विपणन यावर तज्ज्ञांचे  मार्गदर्शन मिळेल जेणेकरून पारंपारिक शेती करणाऱ्यांना आयुर्वेदिक शेतीसह ते करता येईल आणि त्यांच्या  उत्पन्नात भर पडेल.

          केंद्रीय आयुष मंत्री  प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांना आयुर्वेदिक शेती आणि उत्पादन कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होण्याचे आणि पारंपारिक पिकांसोबत औषधी वनस्पती लागवडीची क्षमता शोधण्याचे आवाहन केले आहे.

          शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीचा काही भाग औषधी वनस्पतींसाठी  राखून ठेवल्याने शेतकऱ्यांना शाश्वत आणि लाभदायी उत्पन्न मिळेलतर नागरिकांना उच्च दर्जाचे नैसर्गिक उपचार पर्याय उपलब्ध होतील आणि आयुष मूल्य साखळी अधिक मजबूत होईल  असे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांमधील नागरिकशेतकरीबचत गटविद्यार्थीआरोग्य स्वयंसेवक आणि आयुष भागधारक यांनी शेगावला भेट देऊन राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि या  राष्ट्रीय कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. 


Post a Comment

0 Comments