भूमी अभिलेखचा तालुकास्तरीय जनसंवाद कार्यक्रम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, February 9, 2026

भूमी अभिलेखचा तालुकास्तरीय जनसंवाद कार्यक्रम



*नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. १० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' राबवण्यात येत आहे. यासाठी 'तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुधारीत कार्यक्रमानुसार 20 फेब्रुवारीपासून अभियान राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमात नागरिकांच्या वैयक्तिक व सार्वजनिक तक्रारी, विविध विकासकामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव आणि स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. या दिवशी तहसीलस्तरावर जिल्हा परिषद तसेच संबंधित तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसचिव आणि कृषी सहाय्यक यांची उपस्थिती राहणार आहे.

तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रमासाठी समन्वयक अधिकारी प्रशासनाने तालुकानिहाय जबाबदारी सोपवली असून उपस्थितीत तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम घेण्यासाठी खालीलप्रमाणे घेण्यात आले आहेत.

सकाळी 10 ते 2 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख अमरावती येथे दि. 02 मार्च, 2026 रोजी, दुपारी 3 ते 6 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख भातकुली येथे दि. 02 मार्च, 2026 रोजी, सकाळी 10 ते 1.30 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख मोर्शी  येथे दि. 20 फेब्रुवारी, 2026 रोजी, दुपारी 3 ते 6 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख वरूड  येथे दि. 20 फेब्रुवारी, 2026 रोजी, सकाळी 10 ते 1.30 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख चांदुर बाजार  येथे दि. 23 फेब्रुवारी, 2026 रोजी, सकाळी 10 ते 1.30 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख दर्यापूर येथे दि. 26 फेब्रुवारी, 2026 रोजी, दुपारी 3 ते 6 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख अंजनगाव येथे दि. 26 फेब्रुवारी, 2026 रोजी, सकाळी 12 ते 3 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख चिलखदरा येथे दि. 27 फेब्रुवारी, 2026 रोजी, दुपारी 12 ते 3 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख धारणी  येथे दि. 06 मार्च, 2026 रोजी कार्यक्रम घेण्यात यईल.

जिल्हा परिषद, तसेच संबंधित तालुक्यातील इतर सर्व विभागाचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसचिव, कृषी सहायक यांचे उपस्थितीत तालुक्यातील जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम आयोजित करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे महेशकुमार शिंदे  यांनी केले आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages