परतवाडा येथे ‘ॲडव्हान्स ब्युटी पार्लर’ प्रशिक्षण संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, February 13, 2026

परतवाडा येथे ‘ॲडव्हान्स ब्युटी पार्लर’ प्रशिक्षण संपन्न



 32 महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप

अमरावती, दि. १४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): अचलपूर तालुक्यातील परतवाडा येथे 'ॲडव्हान्स ब्युटी पार्लर' प्रशिक्षण बॅचचा निरोप समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. 1 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या या एक महिन्याच्या विशेष प्रशिक्षणाचा समारोप प्रमाणपत्र वितरण सोहळ्याने करण्यात आला. या उपक्रमाचा एकूण 32 महिला लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

या कार्यक्रमाला विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, उपव्यवस्थापक ऋषिकेश कथलकर, एमसीडी प्रकल्प अधिकारी राजेश सुने, आयोजक गणेश बहाड आणि प्रशिक्षिका जोत्स्ना राऊत उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व 32 महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले. तसेच, व्यवसाय उभारणीसाठी 'अमृत' आणि 'एमसीडी' मार्फत सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

प्रकल्प अधिकारी राजेश सुने यांनी लाभार्थ्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची माहिती देऊन या योजनेच्या माध्यमातून अर्थसाहाय्य मिळवून आपला व्यवसाय यशस्वी कसा करावा, याचे तंत्र समजावून सांगितले.

कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढला असल्याचे सांगितले. प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.काही महिलांनी  स्वतःचा व्यवसायदेखील सुरू केला आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages