अमरावती, दि.१४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी एवं प्रौद्योगिकी संस्थान (सिपेट), रसायन व पेट्रोरसायन विभाग, रसायन व खते मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत असलेली राष्ट्रीय स्वायत्त संस्था असून महाराष्ट्रातील प्लास्टिक उद्योगांना तांत्रिक सहाय्य, कुशल मनुष्यबळ निर्मिती तसेच संशोधन व विकास कार्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथे सिपेट केंद्राची स्थापना सन 2006 मध्ये करण्यात आली आहे. सिपेट संस्था आयएसओ 9001:2015 मानांकन प्राप्त असून येथे एआयसीटीई, मान्यताप्राप्त व एमएसबीटीई समतुल्य प्लास्टिक इंजिनीयरिंगचे विविध अभ्यासक्रम राबविले जातात.
सिपेटमध्ये प्रवेशासाठी दरवर्षी ऑल इंडिया लेव्हल सिपेट अँडमिनीस्ट्रेटर टेस्ट आयोजित करण्यात येते व गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून, सिपेट प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी
https://cipet26.
यावर्षी दहावी, बारावी, डिप्लोमा व बी.एस्सी. (अंतिम वर्ष)ची परीक्षा देणारे विद्यार्थी निकालाची प्रतीक्षा न करता प्रवेश अर्ज भरू शकतात. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिपेटचे प्रशिक्षण प्रमुख आर. जीवन राम यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments