स्वातंत्र्य,समता, बंधुता या संविधानातील मूल्यांची पेरणी ७०० वर्षांपूर्वीच वारकरी संतांनी केली - ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर,बिड - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, February 9, 2026

स्वातंत्र्य,समता, बंधुता या संविधानातील मूल्यांची पेरणी ७०० वर्षांपूर्वीच वारकरी संतांनी केली - ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर,बिड

  • संविधान जसे सर्वांचे, तसाच वारकरी संप्रदायही अठरापगड जातींचा!

ब्राम्हणवाडा थडी, विलास खाजोने (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)दि.१०

स्वातंत्र, समता, बंधुता या संविधानातील मुल्याची पेरणी सातशे वर्षांपूर्वी वारकरी संतांनी समाजामध्ये केली असे प्रतिपादन ह.भ.प.श्यामसुंदर महाराज सौन्नर यांनी संत गुलाबराव महाराज ग्रंथालय वाचनालय आणि संत गुलाबराव महाराज सेवा संस्था भक्तिधाम चांदुर बाजार यांच्ये वतीने आयोजित त्रिदिवसीय व्याख्यानमालेत द्वितीय पुष्प गुंफताना केले.ते पुढे म्हणाले कि, वारकरी संत परंपरा ही एका जाती धर्माची नसुन यामध्ये विविध जाती धर्माचे लोक सामावले आहे.यात ज्ञानेश्वरादी ब्राह्मण, तुकाराम कुणबी, चोखामेळा महार ,शेख महंमद मुसलमान, नरहरी सोनार, सेना न्हावी,सावता माळी, मुक्ताबाई सारख्या ब्रम्हचारीनी, तसेच कान्होपात्रा सारखी वेश्या यांनाही भक्ती करण्याचा अधिकार या संप्रदायात मिळाला.जसे संविधान एका जाती धर्माचे नाही ते सर्वांचेच आहे.तसाच हा वारकरी संप्रदाय सर्वांचा आहे.आजही या संप्रदायामध्ये २२मुसलमान किर्तनकार आहेत.पंचमवेद तुकाराम गाथा सर्वप्रथम एका ख्रिश्चन व्यक्ती ग्रंथ अलेक्झांडर या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूने चोवीस हजार रुपयांची तरतूद करून प्रकाशित केली.जी किंमत अंबानींच्या मताला आहे तिचं किंमत एका शेतकऱ्याच्या मताला आहे हे संविधानाने सौंदर्य आहे.तशीच किंमत सर्व जाती धर्म, स्त्री पुरुष यांना आहे.असे ते म्हणाले.जसे संविधानामुळे प्रतिभाताई पाटील, द्रौपदी  मुर्मु राष्ट्रपती बनल्या तसेच चौतिस वर्षे संत बहिणाबाई यांनी वारकरी संप्रदायातचे नेत्रृत्व केले.ही या संप्रदायाची विशेषतः आहे.असे ते म्हणाले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर मोहोड हे तर प्रमुख अतिथी अर्चनाताई कोरडे ह्या तर प्रायोजक ज्ञानेश्वर डवरे हे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन पंकज आवारे यांनी केले.कार्यक्रमास बहुसंख्य जिज्ञासू नागरिक उपस्थित होते.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages