माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नेत्र तपासणी शिबिर यशस्वी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, January 25, 2026

माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नेत्र तपासणी शिबिर यशस्वी

 महात्मे नेत्र बँक व हॉस्पिटलच्या सहकार्याने शिरसगावात आरोग्य शिबिर; ४०० हून अधिक गरजू रुग्णांना मोठा दिलासा

ग्रामीण उदय  न्यूज नेटवर्क-दि. २६ जानेवारी:

स्थानिक शिरसगाव कसबा येथील आठवडी बाजार चौकात जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. सुरेखा ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि निखिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोफत नेत्ररोग तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास शिरसगाव कसबा व परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत डोळ्यांची तपासणी करून घेतली.


या शिबिरामध्ये नागरिकांची सखोल नेत्र तपासणी करून गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ज्या रुग्णांना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता होती, त्यांना ऑपरेशनच्या तारखाही देण्यात आल्या. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व ग्रामीण भागातील रुग्णांनी या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.
सहभागी संस्था व वैद्यकीय टीम:
या नेत्ररोग तपासणी शिबिरासाठी महात्मे नेत्र बँक व हॉस्पिटल, अमरावती येथील डॉ. संभे, स्मिता नाकाडे व त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय टीमने अथक परिश्रम घेतले. तसेच निखिल ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी स्वयंसेवक म्हणून मोलाची सेवा दिली.
या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा ठाकरे, सरपंच प्रवीण खेरडे, माजी सरपंच शामकुमार सुने, ग्रामपंचायत सदस्य संजय गुर्जर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र यावुल, कांतीलाल सावरकर, तिलकसिंह ठाकूर, हाजी अशफाकभाई काजी, वसंत दाभाडे, कलीमभाई, कलामभाई, अरुण गनथडे, प्रशांत ठाकरे, एडो. शिरभाते, पत्रकार मुबीन शेख, महिला कार्यकर्त्यांमधून आशा बदुकले, सुरेखा निचत यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, "ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सामूहिक जबाबदारी असून अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळतो," असे प्रतिपादन केले. या यशस्वी उपक्रमामुळे शिरसगाव कसबा परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत असून आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages