श्री क्षेत्र बहिरम येथे 'हिंदकेसरी जंगी शंकरपट स्पर्धा' उत्साहात संपन्न; आमदार तायडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, January 25, 2026

श्री क्षेत्र बहिरम येथे 'हिंदकेसरी जंगी शंकरपट स्पर्धा' उत्साहात संपन्न; आमदार तायडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण

 


महाराष्ट्र-मध्यप्रदेशातून ४७८ बैलजोड्यांचा सहभाग;
जनरल गटात 'महाकाल' व 'सेवा' जोडी प्रथम
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) /परतवाडा, २६ जानेवारी:
श्री क्षेत्र बहिरम येथे आयोजित हिंदकेसरी जंगी शंकरपट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार श्री. प्रवीणजी तायडे यांच्या शुभहस्ते विजेत्या बैलजोड्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यांतून एकूण ४७८ बैलजोड्यांनी सहभाग नोंदवून स्पर्धेला मोठे आकर्षण प्राप्त करून दिले.
या शंकरपट स्पर्धेत विविध गटांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या:
जनरल गट:
प्रथम क्रमांक: राज विनोद दमये (कुन्हा, ता. तिवसा) यांच्या महाकाल व अभिषेक बाता (बैतुल, म.प्र.) यांच्या सेवा या जोडीने पटकावला. या जोडीने ६ सेकंद २७ पॉईंटसह यश मिळवले.
द्वितीय क्रमांक: नितू तिवारी (यवतमाळ) यांचे शिव व करण दांडेगावकर (हिंगोली) यांचे सर्जा यांनी मिळवला.
तृतीय क्रमांक: कु. मिशु अन्विका राठोड (बैतुल) यांचा कॅप्टन व मथुरा संदीप गोहाळ (शिंदी उमरी, नरखेड) यांचा भैरव या जोडीने ६ सेकंद ३१ पॉईंटसह ८१,००० रुपयांचे बक्षीस पटकावले.
क गट:
प्रथम क्रमांक: ओमकार खोडकर (आंबेवाडी) यांचा एक्का व शिवप्रसाद मुंजगीर (थोत्रा) यांचा किस्मत यांनी ६ सेकंद २५ पॉईंटसह मिळवला.
द्वितीय क्रमांक: अतिश शेठ वर्मा (वाशिम) यांचा मल्हार व भागवतराव कदम (वसमत) यांचा पिस्टन यांनी मिळवला.
तृतीय क्रमांक: विशाल राजपूत (कपातवाडी) यांचा साई व अंकुश जवांळ (परतवाडा) यांचा देवादादा यांनी पटकावला.
गाव गट:
प्रथम क्रमांक: कार्तिक विधाते (बेलोरा) यांचा श्री व श्री. बजरंगी ग्रुप (सावली, दातोरा) यांचा मन्या यांनी ६ सेकंद ४३ पॉईंटसह मिळवला.
द्वितीय क्रमांक: अतुल पाटील चौधरी (एकलासपूर) यांचे योगी लालबादशाह.
तृतीय क्रमांक: रविंद्र सोलव व गजानन भालेराव (करजगाव) यांचे नशिब भोला यांनी पटकावला.
उपस्थित मान्यवर व मनोगत:
या समारंभाला आमदार प्रवीण तायडे यांच्यासह गजानन कोल्हे, सुधीररसे, रुपेश ढेपे, सचिन कडू, प्रविण तोंडगावकर, तुषार खेरडे, अचलपूर नगरसेविका सौ. अपर्णा रोडे, सौ. अक्षरा लहाने, नगरसेवक सुरेंद्र ताम्बे, तसेच विविध सामाजिक, राजकीय पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये राज्यातून एकूण ४७८ बैलजोड्या सहभागी झाल्या असून, या शंकरपटामुळे संस्कृतीला चालना मिळत असून, बैलजोडींच्या कसबाला व्यासपीठ मिळत असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages