चांदुर बाजार व अचलपूरला पत्रकार भवनासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांचा निधी देणार: आ. प्रवीण तायडे यांची घोषणा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, January 25, 2026

चांदुर बाजार व अचलपूरला पत्रकार भवनासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांचा निधी देणार: आ. प्रवीण तायडे यांची घोषणा



आ. तायडे यांचा पत्रकारांच्या लेखनीचा सन्मान; बहिरम येथील कार्यक्रमात निधी जाहीर
ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क  । चांदुर बाजार, दि. २६ जानेवारी (सोमवार ):
लोकप्रतिनिधी दैनंदिन धावपळीतून थोडा वेळ काढून परस्परांशी संवाद साधण्यासाठी आणि स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी आमदार श्री. प्रवीण तायडे व मित्र परिवार यांच्या वतीने श्री क्षेत्र बहिरम येथे पत्रकार बांधवांसाठी स्नेह मिलन व भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अचलपूर व चांदुर बाजार येथील पत्रकारांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली.
घोषणा व निधी:
स्नेहमिलन कार्यक्रमात आमदार तायडे यांनी जाहीर केले की, जर अचलपूर आणि चांदुर बाजार येथील पत्रकारांनी पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून दिली, तर तात्काळ प्रत्येकी १५ लाख रुपयांचा (एकूण ३० लाख) निधी मंजूर करण्यात येईल. पत्रकारांच्या लेखनीचा सन्मान म्हणून ही घोषणा करण्यात आली.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित असलेल्या चांदुर बाजार येथील जेष्ठ पत्रकार अरुणकुमार कुलथे, युवा पत्रकार सागर सवळे, पत्रकार घनश्याम पालीवाल, सुयोग गोरले, करण खंडारे, मदन भाटे, शरद केदार, राजाभाऊ देशमुख, माजीद इकबाल, संदिप वानखडे आदी पत्रकारांचा पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि भेट वस्तू देऊन आमदार प्रवीण तायडे व त्यांच्या मित्र परिवारांनी यथोचित सन्मान केला.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रवीण तायडे व मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी परिश्रम घेतले.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages