अमरावती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांना भावपूर्ण निरोप; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, January 27, 2026

अमरावती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांना भावपूर्ण निरोप;


 
प्रेरणादायी वक्ते शुभम बायस्कर यांच्या मनोगताने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडां पाणावल्या 

अमरावती  दिनांक २८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

अमरावती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले सर यांच्या निरोप समारंभाला प्रेरणादायी वक्ते शुभम बायस्कार यांनी उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले. यावेळी या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र मॅडम,(IAS) होत्या. त्यांच्यासह व्यासपीठावर अतिरिक्त सीईओ विनय ठमके सर, कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड सर, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुनिल जाधव सर, डेप्युटी सीईओ श्रीराम कुलकर्णी सर, बाळासाहेब बायस सर यांच्यासह झेडपीचे खातेप्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.  युवा प्रेरणादायी वक्ते शुभम बायस्कर यांचे ओघवत्या भाषेतील प्रेरणादायी मनोगत, ज्याला उपस्थित मान्यवरांनी आणि कर्मचाऱ्यांनी उभे राहून जोरदार दाद दिली. 

प्रशासकीय कार्याचा गौरव: डॉ. सुरेश आसोले यांनी आपल्या कार्यकाळात आरोग्य विभागात केलेल्या उल्लेखनीय कामांचा आणि विशेषतः आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांचा गौरव उपस्थित अधिकाऱ्यांनी केला.
प्रेरणादायी व्याख्यान: युवा वक्ते शुभम बायस्कर यांनी आपल्या भाषणात डॉ. आसोले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडताना, "माणूस पदाने नाही तर कर्तृत्वाने मोठा होतो" हे प्रभावीपणे मांडले. त्यांच्या सकारात्मक आणि ऊर्जादायी शब्दांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले होते.
मान्यवरांचे मनोगत: सीईओ संजिता महापात्र यांनी डॉ. आसोले यांच्या संयमी स्वभावाचे आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेचे कौतुक केले. 
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे विविध खातेप्रमुख, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. डॉ. आसोले यांनी आपल्या उत्तरादाखल भाषणात सर्वांचे आभार मानत, सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच आपण ही सेवा यशस्वीपणे पूर्ण करू शकलो, अशी भावना व्यक्त केली. 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages